भांडीवलीत खैर भरलेल्या पिकअपवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:13 IST2019-07-23T23:13:14+5:302019-07-23T23:13:28+5:30
या खैराच्या लाकडांची शासकीय किंमत ११,४३२ रुपये असल्याची माहिती या पथकाकडून प्राप्त झाली.

भांडीवलीत खैर भरलेल्या पिकअपवर कारवाई
माणगाव : तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली पिकअप क्र. एम एच ०६ बी डब्लू २२०७ ही गाडी पकडण्यात आली. ही घटना २२ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे यांच्या पथकामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. या खैराच्या लाकडांची शासकीय किंमत ११,४३२ रुपये असल्याची माहिती या पथकाकडून प्राप्त झाली. या गाडीचा मालक व वाहनचालक नबील बशीर उबारे व या गाडीमध्ये माल भरणारा सोहेल सलीम मुरुडकर (दोघेही रा. आंबेत) यांना चौकशीसाठी वनविभाग रोहा यांनी ताब्यात घेतले आहे. ही खैराची लाकडे खाजगी मालकीच्या जागेतून तोडण्यात आली आहेत की शासकीय जागेत तोडण्यात आली आहेत याबाबतची घटनास्थळी जाऊन रोहा गस्तपथक व वनविभाग चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.