डोळ्यावर झापड आल्याने अपघात, तरुणाचा मृत्यू; अलिबाग-पेण रस्त्यावर दुर्घटना
By निखिल म्हात्रे | Updated: March 4, 2024 15:34 IST2024-03-04T15:34:21+5:302024-03-04T15:34:46+5:30
घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचासाठी वडखळ येथील संजीवणी रुग्णालयात दाखल केले

डोळ्यावर झापड आल्याने अपघात, तरुणाचा मृत्यू; अलिबाग-पेण रस्त्यावर दुर्घटना
अलिबाग - अलिबाग - पेण रस्त्यावर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कार्लेखिंड परीसरात 21 वर्षीय तरुणाचा अपघात झाला. या अपघातात डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला.
मृत देहाच्या बाजूला त्याचे हेल्मेट, मोबाईल, बॅग व गाडी पडलेली होती. विनायक पाटील (वय-21, रा - कल्याण) असे अपघातात जखमी होऊन मृत पावलेल्या तरूणाचे नाव आहे. मध्यरात्री दिडच्या सुमारास विनायक आपल्या मेहूण्याच्या लग्नासाठी कोर्लई येथे निघाला होता. डोळ्यावरील झोप अनवार झाल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.या अपघाताच्या घटनेबाबत पोयनाड पोलिसांना पहाटे 5.40 च्या दरम्यान 112 वर काॅल आला होता.
घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचासाठी वडखळ येथील संजीवणी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर मृतदेह शवविछेदनासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आला होता.