शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी

By राजेश भोस्तेकर | Updated: July 16, 2024 14:27 IST

खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क |

अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीत विभागीय आयुक्त विभागाचे तसेच निर्णय क्षमता असणारे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची नाराजी खासदार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली आहे. जे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे याना दिले असून अधिकाऱ्यांना मला प्रत्यक्ष भेटण्यास सांगा असेही म्हटले आहे. 

जिल्हा नियोजन समितीची शेवटची बैठक जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी १६ जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुरू आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीला सर्व प्रमुख खात्याचे अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असते. मात्र अनेकदा खात्याचे प्रमुख हे आपला प्रतिनिधी पाठवून आपली जबाबदारी टाळत असतात. त्यामुळे बैठकीत उपस्थित झालेल्या महत्वाच्या प्रश्नाचे निराकरण होत नाही. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त करून याचा जाब जिल्हाधिकारी यांना विचारला. 

जिल्हा नियोजन बैठक सुरू झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी विभागीय कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कोणकोण उपस्थित आहेत. याबाबत विचारणा केली. यावेळी अधिकतर अधिकारी हे अनुपस्थित असून त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रमुखांना जिल्हा नियोजन समिती बैठकीचे महत्त्व नाही का ? असा सवाल खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी याना अनुपस्थित अधिकारी याना करणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर अधिकारी याना मला प्रत्यक्ष भेटण्यासही सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांना केल्या आहेत.  पैसे वर्ग करण्यासाठी केली जाते पैशाची मागणी - खासदार तटकरे यांचा आरोप

जिल्हा नियोजन बैठकीत एका पुलाच्या कामांबाबत खासदार सुनील तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर जिल्हा नियोजन अधिकारी महेत्रे यांनी पैसे केंद्राकडून आले नसल्याचे उत्तर दिले. मात्र पैसे वर्ग करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते असा स्पष्ट आरोप तटकरे यांनी केला आहे. याबाबत मेहेत्रे यांनी असे काही होत नाही. याबाबत आपल्याकडे तक्रार असेल तर स्पष्ट करू. असे म्हणाले. तर मग पैसे वर्ग का केले नाही असे तटकरे म्हणून मला जिल्हाधिकारी यांच्या नावाने पत्र द्या देऊन त्यात प्रमा कधी आले, निधी कधी आले याचा उल्लेख करा. अधिवेशनात याबाबत बोलेल असे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड