पनवेल शहरातील दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक

By वैभव गायकर | Updated: May 20, 2024 11:11 IST2024-05-20T11:11:24+5:302024-05-20T11:11:57+5:30

बुरहाणी ट्रेडर्स या दुकानाला आग लागल्याची घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली.

A shop in Panvel city caught fire all the goods got burnt | पनवेल शहरातील दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक

पनवेल शहरातील दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक

पनवेल:उन्हाचा पारा जसा चढतो तसाच दिवसेंदिवस आगीच्या घटनेत वाढ होत आहे. २० मे रोजी पनवेल शहरातील कापड बाजार परिसरात बुरहाणी ट्रेडर्स या दुकानाला आग लागल्याची घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली.

शहरातील कापड बाजार परिसरातील मोठ्या प्रमाणात सराफ दुकाने आहेत.येथील बांठिया ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या बुरहाणी ट्रेडर्स दुकानाला आग लागली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. घटनास्थळी त्वरित पनवेल महानगर पालिकेचे अग्निशमन पथक दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

Web Title: A shop in Panvel city caught fire all the goods got burnt

टॅग्स :panvelपनवेल