शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

एसटीच्या ९० % फेऱ्या निवडणुकीसाठी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:24 IST

विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात परत घेऊन येण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या रायगड जिल्ह्यात तब्बल ६२८ एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत.

अलिबाग : येत्या २३ एप्रिल रोजी होणाºया मतदानाकरिता, रायगड लोकसभा मतदारसंघातील एक हजार ९६६ ग्रामीण व १९६ शहरी अशा एकूण दोन हजार १६२ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे व संबंधित साधनसामग्रीसह मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांना २१ व २२ एप्रिल रोजी घेऊन जाण्याकरिता तसेच २३ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर या सर्वांना संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात परत घेऊन येण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या रायगड जिल्ह्यात तब्बल ६२८ एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा करार राज्य परिवहन मंडळाबरोबर ८ एप्रिल रोजी करण्यात आला असल्याची माहिती रायगडचे उप जिल्हाधिकारी तथा परिवहन व्यवस्थापन समिती प्रमुख जयराज देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड लोकसभा मतदारसंघात राज्य परिवहन मंडळाच्या ७१२ एसटी बसेसचा वापर निवडणूक यंत्रणा करणार आहे. यापैकी ६२८ एसटी बसेस रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या चार विधानसभा क्षेत्राकरिता राज्य परिवहन मंडळाचा रायगड विभाग पुरविणार आहे तर दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघाकरिता ८४ बसेस राज्य परिवहन मंडळाचा रत्नागिरी विभाग पुरवणार आहे. रायगड एसटी विभागाकडून पुरविण्यात येणाºया ६२८ एसटी बसेसमध्ये ५४८ मोठ्या एसटी बसेस तर ८० मिनी बसेसचा समावेश राहणार आहे.>दोन दिवस होणार गैरसोय२२ व २३ एप्रिल रोजी रायगड एसटी विभागाच्या सर्वाधिक एसटी बसेस निवडणूक यंत्रणेच्या सेवेकरिता देण्यात येणार असल्याने रायगड एसटी विभागाच्या दैनंदिन एकूण १५०० प्रवासी सेवा फेऱ्यांपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी फेºया रद्द कराव्या लागणार आहेत.परिणामी, या दोन दिवशी प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. परिणामी, या दिवशी प्रवाशांनी शक्यतो आपला एसटी प्रवास टाळावा किंवा त्या अनुषंगाने प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, असे आवाहन या निमित्ताने राज्य परिवहन मंडळाचे रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.>रायगड एसटी विभाग बसेस नियोजनविधानसभा बस प्रकार २१ एप्रिल २२ एप्रिल २३ एप्रिल २३ एप्रिल एकूणमतदारसंघ (दिवसा) (रात्री)पेण मोठी २१ ४१ ४१ २१ १२४मिनी बस ०० १७ १७ ०० ३४अलिबाग मोठी १६ ५२ ५२ २३ १४३मिनी बस ०० ०० ०० ०० ००श्रीवर्धन मोठी २६ ४६ ४६ २३ १४१मिनी बस ०० ०७ ०७ ०० १४महाड मोठी २९ ४३ ४३ २५ १४०मिनी बस ०० १६ १६ ०० ३२एकूण ९२ २२२ २२२ ९२ ६२८

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड