शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रायगडमध्ये दहा महिन्यांत 9 लाख 46 हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:24 IST

ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ चालकांवर कारवाई

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात केलेल्या संचारबंदीपासून आतापर्यंत ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून मागील १० महिन्यांत ९ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत तालुक्याच्या मुख्य ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या दहा महिन्यांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करता येत आहे. अनेक विद्यार्थी आपल्या महागड्या मोटारसायकल आणि स्कूटर घेऊन शाळा, काॅलेजमध्ये येत असतात. परवाना, महत्त्वाची कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार विद्यार्थ्यांकडून घडत असतात. त्यामुळे नागरिकांसह महाविद्यालयीन मुलांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून सध्या पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

मागील १० महिन्यांचा ट्रिपल सीट वाहन चालविले म्हणून कारवाईचा आकडा पाहता ऑक्टोबर महिन्यात सर्वांत जास्त ३३ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात ४७७ प्रकरणे झाली असून ९५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अलिबाग शहरात सर्वाधिक दंड वसूलट्रिपल सीट गाडी हाकणाऱ्यांविरोधात अलिबाग शहरात वाहतूक विभागाने सर्वाधिक कारवाई करीत दंड वसूल केला आहे. तसेच दंडात्मक कारवाई केलेल्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे.

ऑक्टोबरमध्ये १,६५६ चालकांवर कारवाई अनलाॅक ५ मध्ये सारे काही सुरळीत झाल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडले. अचानक बाहेर पडलेले नागरिक वाहतुकीचे नियमही विसरल्याने ऑक्टोबर महिन्यात १,६५६ वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, मार्च महिन्यात ४९२ प्रकरणे झाली असून ९८ हजार ४०० रुपयांचा दंड, एप्रिल महिन्यात १४९ प्रकरणे झाली असून २९ हजार ८०० रुपयांचा दंड, मे महिन्यात ३३४ प्रकरणे झाली असून ६६ हजार ८०० रुपयांचा दंड, जून महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, जुलै महिन्यात २४८ प्रकरणे झाली असून ४९ हजार ६०० रुपयांचा दंड, ऑगस्ट महिन्यात २०२ प्रकरणे झाली असून ४० हजार ४०० रुपयांचा दंड, सप्टेंबर महिन्यात ३६८ प्रकरणे झाली असून ७३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रायगड पोलीस क्षेत्रातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विषेश मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अल्पवयीन, शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बालकांकडून सध्या दंड वसूल करण्यात येत आहे. याबरोबरच त्या मुलांचे व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न रायगड पोलीस विभाग करीत आहेत.-  रवींद्र शिंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा 

टॅग्स :Policeपोलिस