शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवली मालमत्ता कराची नऊ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 18:41 IST

वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक

मधुकर ठाकूर, उरण : वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास दुर्लक्ष करणाऱ्या उरण येथील मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर थकीत असलेल्या नऊ कोटी दोन लाख ७१ हजार ७२२ रुपयांच्या वसुलीसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीने मंगळवारी (१९) जप्तीची कारवाई केली.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीचे हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि.प्रकल्प उभारण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या कंपनीने भेंडखळ ग्रामपंचायतीची २०१६ पासून मालमत्ता कराची मागील सात वर्षांची एकूण नऊ कोटी दोन लाख ७१ हजार ७२२ रुपये थकबाकी आहे.थकबाकीच्या रकमेचा भरणा मुदतीत करण्यासाठी ग्रामपंचायतींने कंपनीला वारंवार नोटीसाही बजावल्या आहेत. त्याचबरोबर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी थकबाकी भरण्यासाठी निर्वाणीचा इशारा देताना ३० दिवसात भरणा न केल्यास कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही बजावली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या नोटीसीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटिसालाही दाद देत नसल्याने अखेर मंगळवारी (१९) ग्राम विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, सदस्य अजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अक्षता ठाकूर, संगीता भगत,शितल ठाकूर,लिलेश्वर भगत, स्वाती ठाकूर,स्वाती घरत,प्राची पाटील, सोनाली ठाकूर आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली भेंडखळ ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई केली आहे.संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या जप्तीच्या कारवाईनंतर मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लागलीच वठणीवर आली.टर्मिनल  व्यवस्थापक सोमन मुर्मू यांनी नांगी टाकत वरिष्ठांशी चर्चा करून मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम एका महिन्याच्या मुदतीत भरण्याची लेखी पत्राद्वारे हमी दिली आहे.महिन्यात थकबाकीचा भरणा न केल्यास पुन्हा एकदा प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा सरपंच मंजिता पाटीलयांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे.

टॅग्स :uran-acउरण