शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

वाहतूक बंदीने ७५०० कंटेनर जागेवरच; मोदींच्या सभेसाठी जेएनपीएने २०० बस घेतल्या भाड्याने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 06:37 IST

पालघर जिल्ह्यातील ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : वाढवण बंदराच्या पायाभरणीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने एसटीच्या १२० बस, तर ८० खासगी बस भाड्याने घेतल्याचे समोर येत आहे. अवजड माल वाहतूक बंद केल्याने ७५०० कंटेनर मालाचे ट्रेलर्स पार्किंग करून ठेवण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. एसटी महामंडळाची मदत घेत ५५ रुपये प्रतिकिमी दराने १२० बस भाड्याने घेतल्या. रायगड विभागातून ४५, मुंबई सर्कलमधून ८,परेल विभागातून १२, पनवेल विभागातून २२, कुर्ला विभागातून १२ बसेसचा समावेश होता. 

उरण हद्दीत तब्बल ५००० कंटेनर ट्रेलर केले पार्कमोदींच्या सभेसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी गुरुवारपासूनच जेएनपीए परिसरातील सीएफएस, कंटेनर यार्डचालकांची तातडीने बैठक घेत अवजड कंटेनर वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे जेएनपीए परिसरात सुमारे ५००० कंटेनर ट्रेलर पार्किंग करून ठेवण्यात आल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली. उरण हद्दीतही असे तब्बल २५००  कंटेनर उभे असल्याची माहिती उरणचे उपपोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.

कार्यक्रम संपताच कामकाज पूर्ववत गुरुवारी दुपारपासूनच कंटेनर वाहतूक बंद झाल्याने जेएनपीए बंदरातील कामकाजावर खूप परिणाम झाला. मात्र बंदरातील ऑपरेशन्स विभागातील कामावर फारसा परिणाम झालेला नाही. शुक्रवारी रात्रीपासून कंटेनर वाहतूक सुरळीत होऊन कामकाजही पूर्ववत होईल, असा दावा जेएनपीए वाहतूक विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. के. कुलकर्णी यांनी केला.

इतर शहरांमधूनही खासगी बससह इतर लहान वाहनांची सोयदेखील जेएनपीएने केल्याची माहिती  समोर येत आहे. उरण परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, झोपडपट्टीतील कामगार यांना कार्यक्रमस्थळी आणले गेल्याचे चित्र दिसत होते. काही खासगी वाहनांतून दहा-दहा जणांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचेही दिसून आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीuran-acउरण