पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 11:34 IST2024-06-23T11:33:32+5:302024-06-23T11:34:29+5:30
पाळणा घरात ठेवलेल्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे.

पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल : पाळणा घरात ठेवलेल्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पीडितेचे मुलीचे आई-वडील नोकरी निमित्ताने बाहेर जातात. त्यांनी त्यांच्या सात वर्षांच्या मुलीला पाळणा घरात ठेवले होते.
१० मे ते २६ मेच्या दरम्यान रात्री ८ च्या सुमारास आरोपीने या मुलीला किचनमध्ये नेत विनयभंग केला. काही दिवसांनी पुन्हा पीडितेचे आई- वडील तिला पाळणा घरात ठेवण्यासाठी गेले असता, तिने त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. यावेळी कौन्सिलरकडे तिला नेल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दिली