रसायनी परिसरातील ५२३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:02 PM2020-10-31T23:02:22+5:302020-10-31T23:02:41+5:30

CoronaVirus News : वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागानजीकच्या चौक जिल्हा परिषद व वडगाव जिल्हा परिषद विभागातील कोरोना रुग्णांच्या आलेख दिलासादायक आहे.

523 people in the chemical area are corona free | रसायनी परिसरातील ५२३ जण कोरोनामुक्त

रसायनी परिसरातील ५२३ जण कोरोनामुक्त

Next

मोहोपाडा : रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच तालुक्यात इतर भागांपेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वाढतच असल्याने चिंतेची बाब असली, तरी सप्टेंबर अखेरपासून रुग्णवाढ संख्येत बरीच घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास ९४ टक्के आहे. मात्र, पितृपक्षानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे.
वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची ३१ ऑक्टोंबर अखेर झालेली आकडेवारी चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ६७ कोरोनाग्रस्त, बरे झालेले रुग्ण ६२ , मृत्यू ३, उपचार घेत असलेले रुग्ण २, लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ६६ कोरोनाबाधित, बरे झालेले ६५, मृत्यू १, उपचार सुरू असलेले रुग्ण ०, वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४१३ रुग्ण, एकूण बरे ३९६ रुग्ण, एकूण मृत्यू ९ रुग्ण, उपचार सुरू असलेले ८ रुग्ण.
वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागानजीकच्या चौक जिल्हा परिषद व वडगाव जिल्हा परिषद विभागातील कोरोना रुग्णांच्या आलेख दिलासादायक आहे. ऑक्टोबर अखेर चौक ग्रामपंचायत हद्दीत एकूण ११५ कोरोनाबाधित असून, यातील १०१ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाने ८ रुग्णांचा मृत्यू झालेला असला, तरी ६ जणांवर उपचार सुरू आहेत. वडगाव ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४३ कोरोनाबाधित, बरे झालेले ३८ रुग्ण, मृत्यू ३ तर २ उपचार सुरू आहेत, तूपगाव ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४५ कोरोनाबाधित, यातील ३९ जणांची कोरोनावर मात, मृत्यू २ तर ४ जणांवर उपचार सुरू आहेत. इसांबे, वावर्ले, टेंभरी, कलोते एक रुग्ण, वावंढल, वरोसे, आसरे, माजगाव, बोरगाव आदी ग्रामपंचायत हद्दीत रुग्णसंख्या शून्य आहे. ऑक्टोबरअखेर चौक मंडलात एकूण ८७८ रुग्ण संख्या असून, एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत रुग्णांची संख्या लक्षणीय असून, वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत संसर्ग ऑक्टोबरमध्ये कमी असून, यापुढे ही दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्क वापरावेत, असे आवाहन आहे.

Web Title: 523 people in the chemical area are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.