50 लाखांच्या बनावट नोटा खारघर पोलिसांनी केल्या जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 11:25 IST2023-08-25T11:24:48+5:302023-08-25T11:25:49+5:30

पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

50 lakh fake currency seized by kharghar police | 50 लाखांच्या बनावट नोटा खारघर पोलिसांनी केल्या जप्त 

50 लाखांच्या बनावट नोटा खारघर पोलिसांनी केल्या जप्त 

मयूर तांबडे/नवीन पनवेल : खारघर पोलिसांनी खारघर रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून पाचशे रुपयांच्या 49 लाख 90 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी उस्मानभाई दूषप सहा (वय 41 राहणार गुजरात) आणि अब्दुल हसन तुर्क (वय 41 राहणार गुजरात) या दोघांना अटक केली आहे. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. 25 ऑगस्ट रोजी रात्री तीन च्या सुमारास पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर दोन खारघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली. त्यानुसार खारघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला व उस्मानभाई सहा आणि अब्दुल तुर्क या दोघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 49 लाख 90 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडून आल्या. आरोपींकडून एक लाख 9 हजार पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा, एक छोटा मोबाईल, ओप्पो कंपनीचा दोन  मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटा त्यांनी कोणाला देण्यासाठी आणल्या होत्या व कोठून आणल्या याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: 50 lakh fake currency seized by kharghar police