शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4,737 सदस्य; सरपंच पदासाठी 817 उमेदवारी अर्ज दाखल

By निखिल म्हात्रे | Published: October 21, 2023 6:49 PM

उमेदवारांच्या बाहू गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेवर प्रचंड तणाव दिसत होता.

अलिबाग - रायगड जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 15 तालुक्यातून सरपंच पदासाठी 380 आणि सदस्य पदांसाठी 2056 असे एकूण 2436 नवे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील दाखल उमेदवारी अर्जांबाबत रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती. शुक्रवार (20 आॅक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. उमेदवारांच्या बाहू गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेवर प्रचंड तणाव दिसत होता.

रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी तर अलिबाग तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या 157 सदस्य पदांसाठी,  मुरुडमधील 15 ग्रामपंचायतींच्या 145 सदस्य पदांसाठी, पेणमधील 11 ग्रामपंचायतींच्या 118 सदस्य पदांसाठी, पनवेलमधील 17 ग्रामपंचायतींच्या 175 सदस्य पदांसाठी, उरणमध्ये 3 ग्रामपंचायतींच्या 41 सदस्य पदांसाठी, कर्जत 7 ग्रामपंचायतींच्या 67 सदस्य पदांसाठी, खालापुरात 22 ग्रामपंचायतींच्या 202 सदस्य पदांसाठी, रोहामध्ये 12 ग्रामपंचायतींच्या 51 सदस्य पदांसाठी, सुधागडमध्ये 13 ग्रामपंचायतींच्या 112 सदस्य पदांसाठी, माणगावमध्ये 26 ग्रामपंचायतींच्या 222 सदस्य पदांसाठी, तळा येथे 6 ग्रामपंचायतींच्या 50 सदस्य पदांसाठी, महाडमध्ये 21 ग्रामपंचायतींच्या 149 सदस्य पदांसाठी, पोलापुरात 22 ग्रामपंचायतींच्या 162 सदस्य पदांसाठी, श्रीवर्धनमध्ये 8 ग्रामपंचायतींच्या 60 सदस्य पदांसाठी आणि म्हसळामध्ये 12 ग्रामपंचायतींच्या 88 सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच 99 सदस्यपदांसाठी आणि 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होत आहेत.

शुक्रवारी अलिबाग तालुक्यातील 40, मुरुड 25, पेण तालुक्यातील 17, पनवेल 49, उरण 9, कर्जत 25, खालापूर 39, रोहा 33, सुधागड 12, माणगाव 40, तळा 15, महाड 31, पोलापुर 25, श्रीवर्धन 12 आणि म्हसळा तालुक्यातील 8 अशा 15 तालुक्यातील 180 सरपंच पदांसाठी एकूण 380 नवे उमदेवारी अर्ज दाखल झाले. अलिबाग तालुक्यातील 239, मुरुड 204, पेण 96, पनवेल 302, उरण 66, कर्जत 119, खालापूर 183, रोहा 184, सुधागड 75, माणगाव 193, तळा 36, महाड 147, पोलापुर 138, श्रीवर्धन 41 आणि म्हसळा तालुक्यातील 33 अशा 15 तालुक्यातील 1854 सदस्य पदांसाठी एकूण 2056 नवे उमदेवारी अर्ज दाखल झाले. किती ग्रामपंचायती, सरपंच पदे, सदस्य पदे बिनविरोध होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूकalibag-acअलिबाग