शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४0५ इमारती धोकादायक

By admin | Updated: September 3, 2015 03:00 IST

रायगड जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषदांपैकी श्रीवर्धन वगळता उर्वरित सर्व म्हणजे दहा नगरपरिषद क्षेत्रांत एकूण ४०५ इमारती कोणत्याही क्षणी कोसळून

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषदांपैकी श्रीवर्धन वगळता उर्वरित सर्व म्हणजे दहा नगरपरिषद क्षेत्रांत एकूण ४०५ इमारती कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होईल अशा स्थितीत आहेत. या सर्व इमारती ‘धोकादायक’ म्हणून नगरपालिका प्रशासनाने घोषित केल्या आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये या धोकादायक इमारती वा घर मानवी जीवितास धोका होवू नये म्हणून मालकांनी पाडून टाकावी वा दुरुस्त करावी अशा नोटिसा संबंधित नगरपालिकांंनी आपापल्या क्षेत्रातील धोकादायक इमारत मालकांना बजावल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली. नगरपालिका क्षेत्रातील संभाव्य धोकादायक इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करुन त्याचे अहवाल नगरपालिकेला सादर करण्याचेही इमारतीच्या मालकांना व सोसायटींच्या अध्यक्षांना कळविले. जिल्ह्यातील या धोकादायक इमारतींचे ‘लोकमत’ने केलेल्या विशेष सर्वेक्षणातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. धोकादायक म्हणून घोषित ४०५ इमारती व घरांमध्ये सुमारे ६०० कुटुंबे आहेत. कर्जत नगरपालिका क्षेत्रात निष्पन्न झालेल्या एका इमारतीची सुरक्षितता पूर्णपणे बिनधोक असताना नगरपालिकेने ती इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. बहुतांश धोकादायक इमारतींचे मालक आणि त्यामधील भाडेकरु असा वाद न्यायालयात पोहोचला असून, तेथील निर्णय अनिर्णीत असल्याने ही कुटुंबे धोकादायक इमारतीत राहात आहेत. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या काही भाडेकरुंनी न्यायालयात दाद मागून, इमारती दुरुस्ती करण्याची परवानगी आम्हाला मिळावी अशी विनंती केली असता, ती मान्य झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुंनी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्ती स्वखर्चाने करुन घेतली आहे. धोकादायक इमारती या ६० ते ७० वर्षांपूर्वींच्या असून, त्या पाडून तेथे नवी इमारत बांधल्यास, जुन्या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंना ते राहात होते तेवढी जागा नव्या इमारतीत देणे वा नुकसान भरपाई रक्कम जुन्या भाडेकरुस देणे कायद्याने बंधनकारक आहे. धोकादायक इमारत पडल्यावरच बांधू अशी मानसिकता मालकवर्गाची तर नव्या इमारतीतील आपल्या घराचा हक्क सोडायचा नाही म्हणून त्याच धोकादायक इमारतीत राहण्याची मानसिकता भाडेकरुंची असल्याचे सर्वसाधारणपणे सर्वत्र दिसून आले. धोकादायक इमारत पडली आणि त्यात राहणाऱ्या माणसांना हानी पोहोचली तर त्यांची संपूर्ण जबाबदारी त्या इमारतीच्या मालकांची असल्याची भूमिका नगरपालिकेची आहे. याच मुद्याच्या अनुषंगाने अलिबाग येथील ‘रेणुका’ या इमारतीचा पिलर खचून ती धोकादायक झाल्याने, नगरपालिकेने त्या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावल्याने मालकांनी स्वखर्चाने इमारत पाडली. 154सर्वाधिक धोकादायक इमारती व घरे माथेरानमध्ये असली तरी या इमारती व घरांना त्या घराच्या कमकुवततेचा धोका नाही तर त्यावर असणाऱ्या डोंगरांच्या दरडींचा धोका आहे. माथेरान ही नगरपालिका भौगोलिकदृष्ट्या डोंगरावर असल्याने तेथे क्षेत्र मर्यादेची मोठी समस्या आहे. 60 वर्षांपूर्वींच्या इमारती मोठ्या प्रमाणात असून त्या जीर्ण झाल्या आहेत. म्हणून ही घरे व इमारती नगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. जुन्या झालेल्या इमारतींची दुरुस्ती करुन काही मालमत्ताधारकांनी आपापली वास्तू तेथे सुरक्षितपणे राहण्या योग्य केली आहे.