३९९ मीटर लांबीचे अजस्त्र मालवाहू जहाज जेएनपीए बंदरात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:55 IST2023-06-17T15:54:59+5:302023-06-17T15:55:08+5:30
जेएनपीए टर्मिनलवर सुरक्षित आणि वेळेवर पोहोचण्यासाठी या मालवाहू जहाजांने हजारो नॉटिकल मैलांचा प्रवास केला आहे.

३९९ मीटर लांबीचे अजस्त्र मालवाहू जहाज जेएनपीए बंदरात दाखल
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए बंदरात २० फुटी लांबीचे १६ हजार ६५२ कंटेनर क्षमता असलेले १४ मीटर खोली,३९९ मीटर लांब आणि ५४ मीटर रुंदीचे अजस्त्र मालवाहू जहाज शनिवारी (१७) दाखल झाले आहे.
पनामा बंदरातुन निघालेले एमएससी हॅम्बर्ग हे मालवाहू जहाज शनिवारी सकाळी ११.२४ वाजता जेएनपीए अंतर्गत असलेल्या बीएमसीटी बंदरात सुरक्षितपणे पोहोचले. जेएनपीए टर्मिनलवर सुरक्षित आणि वेळेवर पोहोचण्यासाठी या मालवाहू जहाजांने हजारो नॉटिकल मैलांचा प्रवास केला आहे.
या अजस्त्र मालवाहू जहाजाचे जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ,उपवनसंरक्षक
बाळासाहेब पवार ,जेएनपीएचे वाहतूक महाव्यवस्थापक गिरीश थॉमस यांनी एमएससी हॅम्बर्गच्या मास्टरला एक फलक प्रदान करुन स्वागत केले आहे.