शेतकऱ्यांसाठी ३५ कोटींचे पॅकेज

By Admin | Updated: August 5, 2015 00:27 IST2015-08-05T00:27:43+5:302015-08-05T00:27:43+5:30

जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे ४३ हजार ६०४ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३४ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची

35 crores package for farmers | शेतकऱ्यांसाठी ३५ कोटींचे पॅकेज

शेतकऱ्यांसाठी ३५ कोटींचे पॅकेज

आविष्कार देसाई अलिबाग
जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे ४३ हजार ६०४ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३४ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई सरकारने देऊ केली आहे. आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. निधी तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून नुकसानभरपाईची रक्कम घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात जिरायत पिकाखालील १५ हजार ४३६ शेतकऱ्यांचे पाच हजार ३४९.११ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यांना प्रतिहेक्टरी एक हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बागायती पिकाखालील एक हजार २५८ शेतकऱ्यांच्या २७३.६१ हेक्टरवरील नुकसान झाले होते. त्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये मंजूर केले आहेत. ११ हजार ६१४.७२ हेक्टर बागायती पीक असणाऱ्या २६ हजार ९१० शेतकऱ्यांचेही आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले होते.

Web Title: 35 crores package for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.