300वर्षांची परंपरा, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या गौरींचे पूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 20:17 IST2018-09-16T20:16:15+5:302018-09-16T20:17:01+5:30
भारतीय आरमाराचे आद्यनिर्माते अलिबागचे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या अरबी समुद्रातील विविध लठायांच्या दैदिप्यमान ईतिहास जसा आहे

300वर्षांची परंपरा, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या गौरींचे पूजन
जयंत धुळप
अलिबाग - भारतीय आरमाराचे आद्यनिर्माते अलिबागचे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या अरबी समुद्रातील विविध लठायांच्या दैदिप्यमान ईतिहास जसा आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या विविध रुठी-परंपरांचा इतिहासबी प्राचिन आहे. त्यातलीच एक 300 वर्षांची गौरीची प्राचिन परंपरा सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नवव्या पिठीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अलिबाग मधील हिराकोट किल्ल्या शेजारील आपल्या 'घेरीया 'या निवासस्थानी अबाधीत राखली आहे.
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी रत्नागीरी जिल्ह्यातील हर्णे किल्ल्यात सन 1690 मध्ये मुखवट्याच्या या गौरीची ही परंपरा सुरु केली. यंदा या परंपरेतील 328 व्या वर्षीच्या गौरींचे आगमन झाले असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी 'लोकमत 'बोलताना दिली आहे.
सरखेल कान्होजी राजे आग्रे यांनी सुरु केलेल्या परंपरेतीलच मुखवटाच जतन करुन आम्ही गौरीकरिता आजही वापरत असल्याने आम्हाला आमच्या गौरीते पावित्र व महत्व अधिक असल्याचे रघुजीराजे यांनी अखेरीस सांगितले.