मोठी बातमी! महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळली; ७० जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:33 PM2021-07-22T23:33:35+5:302021-07-22T23:41:16+5:30

गावासोबतचा संपर्क पूर्णपणे खंडित; रस्ता खचल्यानं मदतकार्यात अडथळे

30 houses collapsed due to landslide in raigads Mahad 70 people might stucked | मोठी बातमी! महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळली; ७० जण अडकल्याची भीती

मोठी बातमी! महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळली; ७० जण अडकल्याची भीती

Next

महाड: रायगडमधील महाड तालुक्यातील तलीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील जवळपास ३० घरांवर दरड कोसळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७२ रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्यानं अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)
महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तलीये गावात संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून सुमारे ३० घरं गाडली गेली असून ७२ लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरड किती घरांवर कोसळली आणि त्यामुळे किती माणसं अडकली आहेत, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही. तरीही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: 30 houses collapsed due to landslide in raigads Mahad 70 people might stucked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app