शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या पनवेल आगारात 30 टक्के उपस्थिती, कोरोनाचा एसटीला लाखोंचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:09 IST

पनवेल बसस्थानक आगारातून अत्यावश्यक सेवेत दादर, कुर्ला, कल्याण अशा मोजक्याच मार्गांवर बसेस सुरू आहेत.

अरुणकुमार मेहत्रे -कळंबोली : कोरोना संसर्गात सर्वाधिक फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. गतवर्षी पूर्णपणे सात महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारत असताना एप्रिल महिन्यात पुन्हा संचारबंदीसह लॉकडाऊन लागू करण्यात आला. अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी पनवेल आगारातून मोजक्याच बसेस धावत आहेत. शासकीय आदेशानुसार ३० टक्केच कर्मचारी कामावर बोलावले जात आहेत.पनवेल बसस्थानक आगारातून अत्यावश्यक सेवेत दादर, कुर्ला, कल्याण अशा मोजक्याच मार्गांवर बसेस सुरू आहेत. लॉकडाऊन काळात अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. कोरोनाचा काळ आणि त्यात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर बसेस सुरू नसल्याने महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्य परिस्थितीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामे सुरू आहेत. मोजक्याच चालक-वाहकांची उपस्थिती आहे. सध्या पनवेल आगारातून १४ शेड्युल प्रमाणे बसेस चालत आहेत. त्याकरिता २४ चालक - वाहक काम करीत आहेत. काही बसेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल, कामगारांना बोलवावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जास्तीची उपस्थिती न ठेवता गरज असेल तेवढे कर्मचारी उपस्थित राहत आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण राबविले जात आहे.

चालक- वाहक घरीचशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर एसटीला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवेला म्हणावा तितका प्रतिसाद नसल्याने अनेक चालक-वाहक घरीच आहेत. कोरोनाचे नियम पाळण्यात येत असल्याने इतर वेळी गजबजलेले पनवेल बसस्थानकात आजतागायत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती संचारबंदीमुळे बसला कमी प्रतिसाद आहे. सकाळी आणि संध्याकाळी थोडेफार प्रवासी मिळतात. पण, दुपारी बसेस रिकामीच जात आहे. अनेकदा प्रवासी नसल्याने बस फेऱ्या रद्द होतात. काम असले की बस चालवतो. फेरी रद्द झाल्यानंतर बस डेपोत थांबतो आहे.    - चालक

शासनाचे कमी कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचे आदेश असल्याने मी घरीच राहतो आहे. माझ्या सहकाऱ्याने सुट्टी घेतल्यामुळे मी आज ड्युटीवर आलो आहे. बससेवा कमी असल्यामुळे वाहक कमीच लागत आहेत.    - वाहक

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यानुसार कर्मचारी वर्ग बोलाविण्यात येत आहे. तांत्रिकी विभाग आणि प्रशासकीय विभागातील ३० टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती आहे. अत्यावश्यक सेवेत लागणारे कर्मचारी काम करीत आहेत. सध्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे.    - विलास गावडे, आगार प्रमुख, पनवेल 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBus DriverबसचालकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस