शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 07:37 IST

काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कइर्शाळवाडी : दरड कोसळून ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांसह १२ जणांचा समावेश आहे. हे तिघे गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. भगवान तिरकड ( वय २७)), दिनेश तिरकड (२५) व कृष्णा (२३) अशी या तिघा भावडांची नावे आहेत. खालापूर व खोपोली पोलीस ठाण्यातर्गत ते होमगार्डची ड्युटी बजावित होते. त्यांचे आई-वडील, बहीण, दिनेशची पत्नी व दोन मुले असे कुटुंबातील सर्वजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 

तिघा भावापैकी कृष्णा हा अविवाहित होता. तिघे जण कामावरुन परतल्यावर आपल्या मोटारसायकली पायथ्यावरील मोनिवली गावात परिचिताच्या घराजवळ लावत डोंगरावरील घरात जात असत. बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे परतले होते. मात्र काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले.

मदतकार्यात यांचा सहभाग  ३ अप्पर पोलिस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १५ पोलिस निरीक्षक, १७० पोलिस कर्मचारी. एनडीआरएफच्या ४ पथकांत १०० जवान, टीडीआरएफचे ८० जवान, स्थानिक पाच बचाव पथकात ५० जण.

कंपन्यांचे शेकडो कर्मचारी मदतीलाइर्शाळवाडीत यंत्र सामग्री नेणे कठीण होते. त्यामुळे बचाव पथकाच्या मदतीसाठी एल अँड टी, शापूरजी पालनजी, जे. एम. म्हात्रे कंपनीचे शेकडो कर्मचारी फावडे, घमेली घेऊन डोंगर चढून घटनास्थळी दाखल झाले होते.

आरोग्य विभागही तयारीत  दरड दुर्घटनेत जखमींना त्वरित उपचार मिळावे, यासाठी आरोग्य विभागाचे पथही घटनास्थळी होते.  जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभागाचे शेकडो कर्मचारी हजर होते. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरही होते.  उपचारासाठी औषधे उपलब्ध करण्यात आली होती. रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

पशुसंवर्धन विभागही कार्यरत घटनास्थळी एक सहाय्यक आयुक्त, दोन पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांच्यासह दोन पथके तयार करण्यात आली. त्यांच्याकडून जखमी पशूंवर उपचार करणे, मृत पशूंचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी जनावरांना खाद्याचे नियोजन करणे इ. कामे करण्यात आली.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRaigadरायगडRainपाऊस