पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शनिवारी (दि. ७) झालेल्या मतदानात सरासरी ६८.३५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाकडून ही अंतिम आकडेवारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २९ लाख ७६ हजार ८०५ मतदारांपैकी २० लाख ३४ हजार ७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सर्वांत जास्त मतदान राजगड तालुक्यात झाले असून या तालुक्यात ७९.२८ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी मतदान हे बारामती तालुक्यात झाले असून या तालुक्यात ५४.९० टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती तालुक्यात मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे.
या निवडणुकीत एकूण मतदानांपैकी १० लाख ७६ हजार ५९८ पुरुष मतदारांनी मतदान केले, तर ९ लाख ५८ हजार १४४ महिला मतदारांनी मतदान केले. २०१७ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यात ७१.३५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १६.४५ टक्के इतकी घट झाली आहे.
तालुका- एकूण मतदार - झालेले मतदान- टक्केवारी
जुन्नर - ३०७२६० - १८७९९७ - ६१.१८
आंबेगाव - १८४०५२ - १२०१८२ - ६५.३०
शिरूर - ३०१७८६ - २२९२३३ - ७५.९६
खेड - ३००२७० - २२५७२७ - ७५.१७
मावळ - २००३१६ - १५४७४० - ७७.२५
मुळशी-१७३४०१ - ११०८६१ - ६३.९३
हवेली- २५१५३३ - १७२५०६ - ६८.५८
दौंड - २७३१०० - १८७००९ - ६८.४८
पुरंदर - १८९४०३ - १२९४०५ - ६८.३५
राजगड - ५५२३० - ४३७८७ - ७९.२८
भोर -१५४८१० - ११७१६४ - ७५.६८
बारामती - २६४६४२ - १४५२९५ - ५४.९०
इंदापूर - ३२१००२ - २१०८६५ - ६५.६९
एकूण -२९७६८०५ - २०३४७७१ - ६८.३५
Web Summary : In Pune Zilla Parishad elections, Rajgad recorded the highest turnout (79.28%) while Baramati saw the lowest (54.90%). Overall, 68.35% of voters participated. Baramati's decline attributed to Deputy CM Ajit Pawar's demise, causing a significant drop from 2017.
Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव में राजगढ़ में सबसे अधिक (79.28%) मतदान हुआ, जबकि बारामती में सबसे कम (54.90%)। कुल मिलाकर, 68.35% मतदाताओं ने भाग लिया। बारामती में गिरावट का कारण उपमुख्यमंत्री अजित पवार का निधन बताया गया, जिसके चलते 2017 से काफी गिरावट आई।