पळसदेव : नुकतीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पळसदेव गणात पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पळसदेव गणात घड्याळाचे टिक-टिक कायम राहणार की कमळ फुलणार, याचा सस्पेन्स वाढला आहे.
या गणात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभा घेतली. त्यांनी भाषणात म्हटले की, कित्तीही भाषण केली तरी निधीसाठी मला यावे लागते, मी राज्याचा ग्रामविकास मंत्री आहे, असे सांगून भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. शिवाय जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या भागातील अनेक मंडळींनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या गणातील राजकीय वातावरण अधिकच तापले होते. या गणात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वीच सभा घेतली होती. ग्रामविकास मंत्र्यांची सभा झाल्यानंतर तातडीची बैठक देखील बोलवण्यात आली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांनी पडलेले खिंडार बुजवण्यासाठी कृषिमंत्र्यांनी निकराचा प्रयत्न केला होता. भरणे यांनी पळसदेव भागात अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत. त्यांना काम देऊन कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या गणात पाटील विरुद्ध भरणे असा संघर्ष राहिला आहे. मात्र या निवडणुकीत भरणे आणि पाटील एकत्र आल्यामुळे दोघांची ताकद एकत्र होऊन घड्याळाचा विजय सहज होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादीबाबत सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. या लाटेत राष्ट्रवादीचे उमेदवार तरुण निघतो की भाजप आपला झेंडा रोवतो हे निकालानंतर स्पष्ट होईल. पळसदेव गणात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांनीही या गणात चांगलंच लक्ष दिलं असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पाटील आणि भरणे एकत्र आल्यामुळे तालुक्यात जनतेत व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
ही नाराजी कायम राहिली की अजित दादांच्या निधनाने सहानुभूती निर्माण होऊन ती नाराजी कमी झाली हे निकालानंतरच कळेल. मामा आणि भरणे या दोघांना टक्कर देण्यासाठी प्रदीप गारटकर व माने परिवारांनी जोरदार तयारी केली असली तरी अंतिम बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात पूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्रवीण माने निवडून आले होते व पंचायत समितीला देखील पळसदेव गणातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता. आता प्रवीण माने यांनी भाजपमधून प्रत्यक्ष न लढता नवख्या उमेदवाराला संधी देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप व राष्ट्रवादी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे आणि गावात जोरदार पैजा लागल्या आहेत. अंतिम निकालानंतरच कोणाचा पारडं जड आहे हे निश्चित होईल आणि या गटात कमळ फुलते की घड्याळाची टिक-टिक कायम राहते हे स्पष्ट होईल.
Web Summary : Palasdev awaits ZP election results. Gore's BJP push clashes with Bharne's efforts. Ajit Pawar's death creates sympathy, impacting Patil vs. Bharne dynamics. Result uncertain.
Web Summary : पलसदेव में ZP चुनाव का परिणाम प्रतीक्षित है। गोरे के भाजपा समर्थन का भरणे के प्रयासों से टकराव है। अजित पवार की मृत्यु से सहानुभूति बनी, जिसका असर पाटिल बनाम भरणे पर पड़ेगा। परिणाम अनिश्चित है।