शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026 : मतदार यादीतील घोळ; नीरावागज गणात ६५० मतदार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:40 IST

- या बदलामुळे मतदार यादी तयार करताना प्रशासनाची दिशाभूल झाल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सांगवी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान बारामती तालुक्यातील नीरावागज–डोर्लेवाडी गट व नीरावागज गणातील पाहुणेवाडी येथे मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांक १ मधील तब्बल ६५० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे संबंधित मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

माळेगावचे नुकतेच नगरपंचायतीत रूपांतर झाले असून, कारखाना क्षेत्रातील काही भाग पाहुणेवाडी हद्दीत आला आहे. या बदलामुळे मतदार यादी तयार करताना प्रशासनाची दिशाभूल झाल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाहुणेवाडीत केवळ ५३ टक्के मतदान झाले. ज्यांची नावे मतदार यादीत नव्हती, असे अनेक मतदार मतदान केंद्रावर येऊन निराश होऊन माघारी परतले.

विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे यांचेही मतदान असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी दिल्याचे सांगण्यात येत असले, तरी ती यादी ग्रामस्थांना प्रत्यक्ष दाखवून प्रसिद्ध करणे व हरकती मागविणे ही ग्रामसेवक व तलाठी यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी ही प्रक्रिया योग्यरीत्या न राबवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

“६५० नव्हे, तर सुमारे २०० ते २५० मतदारांची नावे येथेच आहेत. विधानसभेला माळेगाव केंद्र होते, तर जिल्हा परिषदेसाठी विधानसभा केंद्रे जशीच्या तशी घेतली आहेत. ३२० मतदारांची यादी मोठी असल्याने एका केंद्राचे दोन केंद्र करण्यात आले. माळेगाव नगरपंचायत झाल्यानंतर ज्यांची नावे यादीत आली नाहीत, त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते.” - नीलम देशमुख, तलाठी (माळेगाव बु.)

“तालुक्यात दोन ठिकाणी आक्षेप नोंदविण्यात आले होते व तेथे आवश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या. या भागात मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीही हरकत घेण्यात आलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादी दुरुस्त करता येत होती. मात्र त्या मुदतीत आक्षेप न घेतल्याने आता बदल शक्य नाही. पुढील वेळी यादी ‘अपडेट’ करता येईल.” - स्वप्नील रावडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 

English
हिंदी सारांश
Web Title : Voter List Chaos: 650 Miss Out on Voting in Phahunewadi

Web Summary : Major voter list errors in Phahunewadi during ZP elections disenfranchised 650 voters. Residents blame administrative oversights during ward restructuring. Officials claim no objections were filed during the correction period.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५