पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दोन तासांत सरासरी 7.74 टक्के मतदान नोंदवले गेले. विशेषतः ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर नागरिकांनी सकाळीच रांगा लावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला.या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेली एक प्रेरणादायी घटना चर्चेचा विषय ठरली. निकिता मनीष गडिया (वय 21) हिने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. केवळ दोन फूट उंची असलेल्या निकिता या मतदान करणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदारांपैकी एक ठरल्या आहेत.
Web Summary : Nikita Gadiya, despite her short stature, inspired many by voting for the first time in the Pune Zilla Parishad elections. Her participation highlights the importance of every vote in a democracy. Her courage is being widely praised.
Web Summary : निकिता गड़िया, अपने छोटे कद के बावजूद, पुणे जिला परिषद चुनावों में पहली बार मतदान करके कई लोगों के लिए प्रेरणा बनीं। उनकी भागीदारी लोकतंत्र में हर वोट के महत्व को दर्शाती है। उनके साहस की व्यापक रूप से सराहना की जा रही है।