शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् सभापतिपदाची लवकरच निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 10:55 IST

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दोन दिवसांत निवडीचा कार्यक्रम जाहीर करणारपंचायत समिती सभापतिसाठी शुक्रवारी सोडत

पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती पदासाठी दिलेली मुदतवाढ येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे पुढील दोन वर्षांसाठी नव्याने पदाधिकारी निवड करणार आहे. शासनाने निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (दि. १0) सांगली जिल्हाधिकारी यांनी तेथील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक २१ डिसेंबर रोजी, तर विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक २३ डिसेंबरला जाहीर केली आहे़  त्यामुळे पुणेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक नेमकी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी इच्छुक महिला सदस्यांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने हवेली तालुक्यातील अर्चना कामठे, पूजा पारगे, अनिता इंगळे, मावळमधील शोभा कदम, शिरूर तालुक्यातील स्वाती पाचुंदकर यांच्यासह विद्यमान सभापती असलेल्या सुजाता पवार, राणी शेळके यांचीही नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, बाबूराव वायकर, प्रमोद काकडे यांची नावे आघाडीवर आहेत. अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ महिला सदस्यांनी दावा केला असून, त्यामध्ये इंदापूरच्या वैशाली पाटील, शिरूरच्या सुनीता गावडे यांचा समावेश आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.......पंचायत समिती सभापतिसाठी शुक्रवारी सोडतजिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. च्नव्याने सभापतिपदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार असून, त्यासाठी १३ पंचायत समित्यांचे यापूर्वीचे आरक्षण विचारात घेऊन चक्राकार पद्धतीने सभापतिपदाचे आरक्षण ठेवले जाईल. च्अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षण हे चक्राकार पद्धतीने त्यात या प्रवर्गातील लोकसंख्येच्या निकषानुसार निश्चित केले जाईल. मात्र, महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. १३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ही आरक्षण सोडत होणार आहे........

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडzpजिल्हा परिषद