शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य अभियानाच्या लेखापालाला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:51 IST

बिल काढण्यासाठी मागितली होती टक्केवारी : २० हजार घेताना पकडले.

पुणे : पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याच्या कामाचे बिल काढण्याचा मोबदला म्हणून २० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. 

विजय मधुकर चितोडे (वय ४५) असे या लेखापालाचे नाव आहे. जिल्हा परिषदेतच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा लावून ही कारवाई केली. 

तक्रारदार यांच्या कंपनीला पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगाराच्या आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याचे काम मिळाले होते. त्यांनी हे छपाईचे काम पूर्ण करुन त्याचे ५ लाख ७० हजार रुपयांचे बिल जिल्हा परिषदेला सादर केले होते. हे बिल मंजूरीसाठी लेखापाल विजय चितोडे याच्याकडे आले होते. तक्रारदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर बिलाच्या मंजूरीसाठी २५ हजार रुपये (५ टक्के)लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानुसार १७ मे रोजी पडताळणी केली. त्यात चितोडे याने तडजोड करुन २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली़ मात्र, काल ते नसल्याने आज पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना विजय चितोडे याला पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. 

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदBribe Caseलाच प्रकरणArrestअटक