शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election : दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल; गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:03 IST

दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल, गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी पाच अर्ज आले असून पंचायत समितीच्या गणांसाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७३ गटांसाठी ९४० अर्जांची विक्री झाली असून १४६ गणांसाठी १ हजार २६५ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १६) सुरू झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, १८ जानेवारी रोजी रविवार असल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी एकूण ९४० अर्जांची विक्री झाली आहे. त्यात शुक्रवारी ५३५ अर्जांची विक्री झाली व एक अर्ज प्राप्त झाला तर शनिवारी ४०५ अर्जांची विक्री होऊन ४ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण ५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात प्रत्येकी २ अर्ज इंदापूर व खेड तालुक्यामधून आले आहेत तर एक अर्ज हवेलीतून आला आहे. यात ४ पुरुष तर एक महिला आहे. 

तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी आतापर्यंत १ हजार २६५ अर्जांची विक्री झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ७७२ अर्जांची विक्री होऊन एक अर्ज दाखल झाला होता तर शनिवारी ४९३ अर्जांची विक्री झाली व ३ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण ४ अर्ज दाखल झाले आहेत. यात ३ अर्ज खेड तर एक अर्ज हवेलीतून आला आहे. यात चारही अर्ज पुरुषांचे आहेत. गणांसाठीच्या अर्ज विक्रीत सर्वाधिक १९४ अर्ज तर गटांसाठीही सर्वाधिक १३० अर्ज एकट्या दौंड तालुक्यातून विक्री झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad Election: Few applications filed, many forms sold in Pune.

Web Summary : Zilla Parishad elections see limited applications but high form sales in Pune. Five ZP, four Panchayat Samiti applications filed. Deadline: January 21.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र