शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026 :हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मतदानासाठी बावड्यात; “निर्भयपणे मतदान करा” मतदारांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:44 IST

तळागाळातील मतदार विकासावरच मतदान करतो; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास

बावडा (ता. इंदापूर) - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथील मतदान केंद्र क्रमांक 72/20, बूथ क्रमांक 315अ येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तळागाळातील मतदार विकासाच्या मुद्द्यावरच निर्णय घेतो, असा विश्वास व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भय आणि मोकळ्या वातावरणात आपल्या विवेकबुद्धीनुसार मतदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही सहकाऱ्यांची कायमची अनुपस्थिती जाणवत असल्याने मनात दुःख असल्याचे सांगत त्यांनी कर्तव्य म्हणून मतदान करणे महत्त्वाचे असल्यावर भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असल्याचे सांगत, इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील मतदारांनी विकासाचा विचार करून उमेदवारांना समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अंकिता पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Harshvardhan Patil and family vote in Bawda; urge voters to vote.

Web Summary : Harshvardhan Patil, with family, voted in Bawda for Zilla Parishad elections. He emphasized voting's importance in democracy and urged voters to participate fearlessly, considering development. He acknowledged colleagues' absence and stressed the need for increased voter turnout.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे