पुणे : राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच पुणे जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता भंगाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चार सहकारी संस्थांना निवडणूक विभागाकडून नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नोटीस मिळालेल्या संस्थांमध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती तालुका दूध संघ आणि बारामती खरेदी–विक्री संघ यांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू असताना या संस्थांकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव विविध संस्थांना आणि बाजारांना देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घोषणा मतदारांवर प्रभाव टाकू शकतात, असा प्राथमिक निष्कर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने काढला आहे. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे मानत संबंधित संस्थांविरोधात अधिकृत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत.
Web Summary : Four Pune co-operative societies received notices for violating election code of conduct. They announced naming institutions after Ajit Pawar, potentially influencing voters. Action initiated after preliminary findings.
Web Summary : पुणे की चार सहकारी समितियों को चुनाव आचार संहिता उल्लंघन पर नोटिस। अजित पवार के नाम पर संस्थानों की घोषणा से मतदाताओं को प्रभावित करने की आशंका। प्रारंभिक निष्कर्ष के बाद कार्रवाई शुरू।