शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भोरमध्ये सत्तासमीकरण बदलले; भाजप–राष्ट्रवादी फिफ्टी-फिफ्टी, शिवसेना खातेशून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:40 IST

- एक माजी पंचायत समिती सदस्य पुन्हा विजयी झाला असून, सहा नवे सदस्य निवडून आले आहेत.

भोर : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्तासमीकरण बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना समान म्हणजेच फिफ्टी-फिफ्टी जागा मिळाल्या असून, दोन जागा असलेल्या शिवसेनेला यावेळी एकही जागा मिळवता आलेली नाही. या निकालात दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पराभव झाला, तर दोन महिला माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीवर निवडून आल्या आहेत. एक माजी पंचायत समिती सदस्य पुन्हा विजयी झाला असून, सहा नवे सदस्य निवडून आले आहेत.

पुणे–सातारा महामार्गावरील वेळू-नसरापूर गटात मागील निवडणुकीत शिवसेनेचे एक जिल्हा परिषद व एक पंचायत समिती सदस्य विजयी झाले होते. मात्र, यावेळी शिवसेनेला येथे एकही जागा मिळाली नाही. भाजपने येथे जोरदार मुसंडी मारत एक जिल्हा परिषद गट व एक पंचायत समिती गण जिंकला, तर एक गण राष्ट्रवादीकडे गेला. उबाठा व शिंदे गटातील मत विभागणीचा फायदा भाजपाला झाल्याचे चित्र असून, शिवसेनेला भविष्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार)कडून गणेश खुटवड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. भाजपचे माजी अध्यक्ष जीवन कोंडे यांनी नशीब अजमावले; परंतु त्यांची अनामत जप्त झाली. मागील दोन निवडणुकांत पराभूत झालेले ज्ञानेश्वर पांगारे यांनी यावेळी बाजी मारली. नसरापूर गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल कोंडे यांनी विजय मिळवत महामार्ग पट्ट्यात अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीचे खाते उघडले.

कामथडी-भोंगवली गटात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड विजयी झाले. या गटात राष्ट्रवादीत बंडखोरी असूनही पक्षाने आपला बालेकिल्ला कायम राखला. पंचायत समिती भोंगवली गणातून भाजपचे रोहन बाठे विजयी झाले, तर कामथडी गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तृप्ती खुटवड यांनी विजय मिळवला. या गटात पती-पत्नी अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडून आले.

शिंद-भोलावडे गटात माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे यांचा पराभव करत सरपंच प्रवीण जगदाळे यांनी जिल्हा परिषद गाठली. पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकत हा गट आपला बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये झालेले प्रवेश अपेक्षित लाभ देऊ शकले नाहीत.

उत्रोली-कारी गटात माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांच्यात चुरशीची लढत झाली. नियोजनबद्ध प्रचाराच्या जोरावर थोपटे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा काढला. पंचायत समितीच्या दोन्ही गणांत भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने वीसगाव व अंबावडे खोरे भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhor Politics Shift: BJP-NCP Tie, Shiv Sena Zero Seats

Web Summary : Bhor's local elections saw BJP and NCP (Ajit Pawar) splitting seats equally. Shiv Sena lost ground. Key upsets and new faces emerged in Zilla Parishad and Panchayat Samiti polls, signaling a significant power shift. BJP gains benefited from split Ubaatha and Shinde votes.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र