चाकण : राष्ट्रवादीच्या तालमीत तयार होऊन मागील निवडणूक काळात भारतीय जनता पक्षात गेलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह एक तपानंतर पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वराळे (ता.खेड) येथे जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे राजकीय बळ वाढून भाजपला मात्र चांगलाच फटका बसला आहे.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, सुरेश घुले, राजेंद्र कोरेकर, सुनील चांदेरे, लक्ष्मण टोपे, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, अरुण चांभारे, विलास कातोरे, अजित बुट्टे पाटील, जयसिंग दरेकर, चांगदेव शिवेकर, नीलेश थिगळे, अमोल पानमंद, आशिष येळवंडे, पप्पू टोपे, सय्यद इनामदार, मोबिन काझी, गणेश बोत्रे, राम गोरे, मोबिन काझी, सचिन पानसरे, नगरसेविका विजया तोडकर, रेश्मा मुटके, सुनीता बुट्टे पाटील, श्रद्धा मांडेकर, सुनील देवकर, काळूराम पिंजण, शरद निखाडे, शिवाजी डावरे, रोहित डावरे, दत्तात्रय टेमगिरे, सुनील देवकर आदींसह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, अजित पवारांनी आपल्या बालेकिल्ल्याची भिंत आणखी मजबूत केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राजकारणातील हुकमी एक्का असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अचूक चाल टाकली असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
Web Summary : Sharad Butte Patil rejoined NCP after a decade in BJP, strengthening NCP in Pune district. Ajit Pawar welcomed him, boosting party prospects before local elections. This move is seen as strategically advantageous for NCP.
Web Summary : शरद बुट्टे पाटिल भाजपा में एक दशक के बाद एनसीपी में शामिल हुए, जिससे पुणे जिले में एनसीपी मजबूत हुई। अजित पवार ने उनका स्वागत किया, जिससे स्थानीय चुनावों से पहले पार्टी की संभावनाएं बढ़ गईं। इस कदम को एनसीपी के लिए रणनीतिक रूप से फायदेमंद माना जा रहा है।