युवा पिढीच्या ऊर्जेला रचनात्मक दिशेची गरज : अंजली भागवत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:34 PM2020-01-13T19:34:04+5:302020-01-13T19:38:56+5:30

खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता याचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत..

Youth's energy needs in creative direction: Anjali Bhagwat | युवा पिढीच्या ऊर्जेला रचनात्मक दिशेची गरज : अंजली भागवत 

युवा पिढीच्या ऊर्जेला रचनात्मक दिशेची गरज : अंजली भागवत 

googlenewsNext
ठळक मुद्देयुवा चेतना दिन : 

पुणे : आजची युवा पिढी ही अधिक ऊर्जावान आणि बुद्धिवान आहे. त्यांच्यातल्या ऊर्जेला रचनात्मक दिशा देण्याची गरज असून त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालकांची आहे. युवा पिढीत दिसणारी नकारात्मकता दूर करण्याचे काम खेळांच्या माध्यमातूनच होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी केले़.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ' युवा चेतना दिन ' साजरा करण्यात आला़ यावेळी आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रशांत डोंगरे, तसेच संस्थेचे प्रदीप नाईक, राजीव सहस्त्रबुद्धे, अभय क्षीरसागर, विजय भालेराव, सुधीर भोसले, डॉ़ भरत व्हनकटे, सुधीर गाडे आदी उपस्थित होते. 
अंजली भागवत यांनी सांगितले की,  खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता याचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत ठरतो. जीवनात ध्येय निश्चित करुन ते गाठण्यासाठी अथक परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांचे संस्कार खेळांद्वारे होतात. त्यामुळे खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. 
प्रशांत डोंगरे यांनी स्वामी विवेकांनंदांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करुन दिला. या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी लेझिम, सर्वांगसुंदर व्यायाम, अरोबिक्स, एक हजार विद्यार्थ्यांचे सांघिक गीत गायन, राज्यातील विविध सणांच्या संकल्पनेवर आधारित विविध रचना, मर्दानी खेळ अशा विविध क्रीडा प्रकारांची प्रात्याक्षिके सादर केली. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या ‘सावली’ संस्थेतील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते. 

Web Title: Youth's energy needs in creative direction: Anjali Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.