कोरेगाव मूळ येथे तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:29+5:302021-02-05T05:10:29+5:30
उमेश मतरू मडावी (वय २४, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. आंबेझरी, ता. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली) असे गळफास ...

कोरेगाव मूळ येथे तरुणाने घेतला गळफास
उमेश मतरू मडावी (वय २४, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. आंबेझरी, ता. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप फागुजी हारामी (वय २८ रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. आंधळी ता.कुरखेडा, जि. गडचिरोली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दिलीप हारामी हे कोरेगाव मूळ येथील महेश सीताराम शिंदे यांच्या बोअरच्या गाडीवर कामगार म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिल मंडावी याने झोपेतून उठवून संगितले की, उमेश मतरू मडावी याने पार्किंगमध्ये असलेल्या जंगली झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. त्यानुसार बोअरगाडी मालक महेश शिंदे व दिलीप हारामी यांनी जाऊन पाहणी केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली , याप्रकरणी तपास पोलिस हवालदार सोमनाथ चितारे करीत आहेत.
--