शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्येतून तरूणाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:56 IST

कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच आईच्या आजारपणावर उपचारासाठी होणारा खर्च यामुळे आर्थिक ओढाताण होवू लागली.

ठळक मुद्देआईच्या उपचारासाठी होणारा खर्चामुळे आर्थिक ओढाताण

पिंपरी : आईच्या गंभीर आजारामुळे आलेल्या नैराश्यातून २४ वर्षाच्या तरूण मुलाने आत्महत्या केली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री ताथवडे येथे उघडकीस आला. गौतम चंद्रकांत ठोसर (वय २४, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे, मूळ रा. सोलापूर), असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे .   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम त्याचा मोठा भाऊ आणि आई ताथवडे येथे राहतात. गौतम इलेक्ट्रिकलची कामे करतो. मागील काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी दोघा भावांवर आली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला गंभीर आजाराने ग्रासले. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच आईच्या आजारपणावर उपचारासाठी होणारा खर्च यामुळे आर्थिक ओढाताण होवू लागली. गौतमला नैराश्य आले. बुधवारी घरी कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारनंतर गौतमचा मोठा भाऊ घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. गौतमच्या भावाने मित्रांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला, त्यावेळी गौतमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाDeathमृत्यूPoliceपोलिस