बारामती तालुक्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:30 IST2023-04-12T12:28:29+5:302023-04-12T12:30:05+5:30
अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला...

बारामती तालुक्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून; परिसरात खळबळ
सांगवी (पुणे) : सांगवी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. १२) सकाळच्या दरम्यान अज्ञाताकडून तरुणाचा दगडाने ठेवून खून झाल्याची घटना समोर आली आहे. विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे दगडाने ठेचून खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत विनोद फडतरे हा सकाळी सांगवी -पणदरे रस्त्यावरील शेतात दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) वरुन गेला होता.
त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी माळेगाव पोलिसांना माहिती दिली असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.