तरुणाने वाचविले घारीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:32 IST2019-01-07T22:31:43+5:302019-01-07T22:32:32+5:30

याबाबत माहिती अशी, की कुंजीरवाडी येथे वास्तव्यास असणारे रुग्णवाहिका चालक सचिन मोटे हे कामावर निघाले होते.

Youth saved lives of bird in pune | तरुणाने वाचविले घारीचे प्राण

तरुणाने वाचविले घारीचे प्राण

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील दोन तरुणांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे गंभीर जखमी असलेल्या घारीला जीवदान मिळाले असून, या तरुणांचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी, की कुंजीरवाडी येथे वास्तव्यास असणारे रुग्णवाहिका चालक सचिन मोटे हे कामावर निघाले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेला जखमी अवस्थेतील घार त्यांना दिसली. तिची थोडी हालचाल होत असल्याने त्यांनी घारीला उचलून घेतले. तिची तपासणी केल्यावर तिच्या पंखाजवळ जखम झालेली दिसली. त्यामुळे ती उडू शकत नव्हती. अशा अवस्थेत तिला सोडले तर तिचा मृत्यू होईल, यामुळे त्यांनी शिवसेना हवेली संघटक स्वप्निल कुंजीर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच कुंजीर यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब ढोले यांच्याकडे त्यांना पाठविले. घारीवर उपचार झाल्यावर वन खात्याचे वनरक्षक नाना भोंडवे यांच्याकडे घारीला सुपूर्द केले. त्यामुळे घारीचे प्राण वाचले असून, तिची जखम बरी होताच तिला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार आहे.
 

Web Title: Youth saved lives of bird in pune

टॅग्स :Puneपुणे