शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंदापुरातील निमगाव केतकी परिसरात युवकाची हत्या; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:15 IST

राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले.

ठळक मुद्देनिमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के या युवकाची हत्याशेत जमीन घेण्याच्या दृष्टीने त्याची चालू होती बोलणी

इंदापूर : निमगाव केतकीच्या उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या दक्षिणेला साधारणत: चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निमगाव केतकी गावच्या हद्दीतील राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर ननवरे नावाच्या शेतकऱ्याच्या शेताजवळ मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे, फौजदार सुशांत किनगे, अमोल ननावरे, दिनेश कुलकर्णी, हवालदार शंकरराव वाघमारे, अंकुश खोमणे, पोलीस कर्मचारी अमीत यादव, जगदीश चौधर, बापू मोहिते, अमित चव्हाण, महेश माने आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले.म्हस्के याने या भागात नव्यानेच जमिन घेतली आहे. त्यावर डाळिंबाची बाग आहे. आणखी शेत जमीन घेण्याच्या दृष्टीने त्याची बोलणी चालली होती. उद्या सौदा होणार होता. मेव्हण्याच्या लग्नाच्या निमित्ताने म्हस्के हा तीन दिवसांपासून सासरवाडीला होता. नवविवाहित जोडप्याबरोबर तो ही सहकुटुंब देवदर्शनासाठी जावून आला होता. रविवारी रात्री दुचाकीवरुन डाळिंबाच्या शेताकडे जाताना रस्त्यावरच दुचाकीवर असताना त्याच्यावर हल्ला झाला. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर प्राणघातक घाव आहेत. झटापटीत सदऱ्याचे बटण तुटले आहे. सामानाची पिशवी दुचाकीच्या हँडलला आहे. विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर सकाळी नऊ वाजता घटना स्थळावर आले आहेत. फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे