लायन्स पॉईटच्या दरीत पडून युवक ठार; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:28 IST2017-08-26T22:27:26+5:302017-08-26T22:28:26+5:30

लोणावळ्यातील लायन्स पॉईट या ठिकाणाहून गुरुवारी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सुमारे 450 फुट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला.

 Youth killed in Lions Poet; Bodies found after three days | लायन्स पॉईटच्या दरीत पडून युवक ठार; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

लायन्स पॉईटच्या दरीत पडून युवक ठार; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

ठळक मुद्देलोणावळ्यातील लायन्स पॉईट या ठिकाणाहून गुरुवारी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सुमारे 450 फुट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला. शिवदुर्ग मित्रच्या टीमला शनिवारी मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

लोणावळा, दि. 26 - लोणावळ्यातील लायन्स पॉईट या ठिकाणाहून गुरुवारी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सुमारे 450 फुट खोल दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या टीमला शनिवारी यश आले आहे. आदित्य मनिष कदम (वय 20 रा. पुणे) असे या मयत युवकाचे नाव आहे. 

गुरुवारी सायंकाळी आदित्य हा लायन्स पॉईट येथून बेपत्ता झाला असल्याची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमला मिळाली. आज सकाळपासून लायन्स पॉईट परिसरात शिवदुर्गने शोधकार्य सुरु केले. मंडळाचे सदस्य अनिकेत देशमुख व प्रविण देशमुख हे दोघे दरीत उतरून मृतदेह शोधत असताना धुके व पावसामुळे शोधकार्यात बरेच अडथळे येत होते. दुपारी 1.30 सुमारास आदित्यचा मृतदेह दरीत सापडला, अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 4.30 वाजता त्यांला रोपच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आले.  या शोध पथकात शिवदुर्गचे अजय राऊत, राजेंद्र कडु, दिनेश पवार, महेश मसने ,ब्रिजेश ठाकुर , अशोक उंबरे , राजू पाटील , रोहीत वर्तक , गणेश गिध, अनिकेत देशमुख , प्रविण देशमुख , अजय शेलार, सुनिल गायकवाड सहभागी झाले होते

Web Title:  Youth killed in Lions Poet; Bodies found after three days