तरुणाई व्हाॅट्सॲपद्वारे करतेय कोरोना रुग्णांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:56+5:302021-05-30T04:08:56+5:30
पुणे : सोशल मीडियावर दंग असलेली तरुणाई सोशल मीडियाचा वापर करून विधायक कामे करीत आहे. कोणी रेमडेसिविर कुठे ...

तरुणाई व्हाॅट्सॲपद्वारे करतेय कोरोना रुग्णांची मदत
पुणे : सोशल मीडियावर दंग असलेली तरुणाई सोशल मीडियाचा वापर करून विधायक कामे करीत आहे. कोणी रेमडेसिविर कुठे उपलब्ध आहे का ? हे पाहत आहे, तर कुणी बेड कुठे उपलब्ध आहे का ? त्याची माहिती गरजू रुग्णांच्या नातेवाईकपर्यंत पोहोचवत आहेत. आता जरी पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी एप्रिल - मे महिन्यात दिवस-रात्र गरजूपर्यंत संदेश पोहोचविण्यात मग्न होती. आतापर्यंत हजारहून अधिक रुग्णांना मदत झाली आहे.
कुणी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतोय, तर कुणी मेडिकलचे. या सर्वांच्या अभ्यासक्रमाचे क्षेत्र जरी वेगळे असले तरीही ते एकत्र आले आहेत. निमित्त होते कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णास मदत करण्याचे. किंग्स पॅनिटाटोरी कोरोना योद्धा या नावाने व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला. यासाठी पुण्यातील ३० ते ४० युवकांनी पुढाकार घेतला. यातील काही तरुणांचे गट तयार करण्यात आले. त्यांना आपली जबाबदारी वाटून देण्यात आली. काही जण इंटरनेटवर पुण्यात बेड, व्हेंटिलेटर, कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मिळवीत. काही जण हॉस्पिटल प्रशासनाशी थेट संपर्क करून रोजची स्थिती जाणून घेत. काही जण ग्रुपवर विचारली जाणाऱ्या माहितीचा शोध घेऊन त्यांना त्याबाबत आवश्यक ती माहिती तत्काळ उपलब्ध करून देत आहे. गरजूंना ज्या वेळी उपचाराबाबतची माहिती सहज उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी या तरुणाईचा मदतीचा हात त्यांच्यासाठी मोलाचा ठरत. यात
संदेश खोरे, खुशबू रावत, अश्विनी पटेल, करण गडाले, अद्वैत भुजबळ यांचा मोलाचा सहभाग आहे.
-------------------
एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती खूप चिंताजनक होती. ऑक्सिजन, बेड, प्लाझ्मा, रेमडेसिविर यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः भटकावे लागते. तेव्हा यांना त्यांची माहिती सहज उपलब्ध करून देण्याचा विचार मनात आला. त्यातून ह्या ग्रुपची निर्मिती झाली.
- नीतू पुष्कर, ग्रुपची सदस्या, पुणे