शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमध्ये युवकाची धारधार शस्त्राने हत्या; खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:39 IST

मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास हत्या

वडगाव मावळ : वडगाव येथील एका युवकाची सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास लोखंडी कोयते व तलवारीने डोक्यात आणि अंगावर वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तीन महिन्यातील दुसरा खून या प्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड (वय २८,रा. वारंगवाडी) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विश्वजित राजेंद्र देशमुख (वय २२, रा. संस्कृती सोसायटी वडगाव ता. मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून महेश गायकवाड व अभिशेख अनंता ढोरे हे जखमी झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावच्या हद्दीतील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपसमोर रोडवर पूर्वी झालेल्या कुठल्यातरी भांडणाच्या पूर्ववैमनस्यातून सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास १० ते १२ अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन त्यांचे हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत देशमुख याचे डोक्यात, पाठीवर वार करून त्यास जिवे ठार मारले. तसेच सदरची भांडणे सोडविण्यास गेलेल्या महेश गायकवाड (रा. वारंगवाडी) व अभिशेख अनंता ढोरे याचेवर देखील त्यांनी कोयत्याने व तलवारीने वार करून त्यांना जखमी केले आहे. तसेच त्यांच्या गाडयांची तोडफोड करून नुकसान केले असल्याची महेश गायकवाड याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक दिपेश गट्टे, पोलिस उप अधिक्षक भाऊसाहेब ढोले,  यांनी  घटनास्थळी प्रत्येक्ष भेट देऊन पंचनामा करण्यात आला असून या गुन्ह्यातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले हे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीVadgaon Mavalवडगाव मावळ