लोणावळा : शहर परिसरात वर्षाविहाराला आलेल्या पुण्यातील एका युवकाचा लायन्स पॉईंट जवळील गिधाड तलाव धबधब्यात पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. श्रीराम दुर्ज साहू (वय 24, मूळ रा. पांड्या पुरुषोत्तमपुर,ओडीसा. सध्या रा. सणसवाडी, पुणे) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र संजयकुमार साहू याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात श्रीराम याच्या मृत्युची माहिती दिली.
लोणावळ्यातील गिधाड तलाव धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:58 IST