लोणावळ्याजवळील राजमाची पॉईंट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:47 IST2019-09-03T14:46:35+5:302019-09-03T14:47:27+5:30
ह्या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही..

लोणावळ्याजवळील राजमाची पॉईंट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू
लोणावळा : खंडाळ्यातील राजमाची पॉईट येथून द्रुतगती मार्गावर पडल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची अशी नोंद करण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी युवकाचे वय अंदाजे 28 ते 34 दरम्यान आहे. त्याच्या हातावर ओम गोंदवलेला आहे. अंगावर निळा व चॉकलेटी रंगाचा चेक्सचा फुल शर्ट व क्रिम रंगाचे पॅन्ट असून उंची पाच फुट दहा इंच आहे. हा युवक कसा पडला तसेच तो कोण व कुठला आहे, याचा शोध लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटणकर व पोलीस कॉन्स्टेबल सागर धनवे हे करत आहे. वरील वर्णनाच्या युवकाविषयी कोणाला माहिती असल्यास लोणावळा शहर पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे