शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी येथील नाझरे जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:43 IST

खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले कुटुंबीय नाझरे धरणात स्नानासाठी गेले असता त्यांच्या कुटुंबीयातील तरुणाचा बुडून मृत्यू झाला,

जेजुरी : खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले कुटुंबीय नाझरे धरणात स्नानासाठी गेले असता त्यांच्या कुटुंबीयातील तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी ७ च्या सुमारास घडली. राहुल शंकर पाटील (वय १८, रा. कुर्ला-नेहरूनगर, मुंबई) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश सखाराम पाटील यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांच्या परिवारातील सदस्य जेजुरी येथे चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरीत आलेले होते. देवदर्शनापूर्वी सर्वजण मल्हारसागर जलाशयावर कऱ्हा स्नानासाठी गेले होते. प्रकाश पाटील यांचे दोन पुतणे रोहित शंकर पाटील व राहुल शंकर पाटील हे आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. पाटील परिवाराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रोहितला वाचविण्यात यश आले. मात्र,  राहुल पाण्यात बुडाला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस व पोहणा-या माहितगारांच्या मदतीने शोध घेत सुमारे दोन तासानंतर राहुल पाटील याचा मृतदेह पाण्यातून  बाहेर काढण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार कदम तपास करीत आहेत..............

धरणात गाळयुक्त पाणीसाठा असल्याने भाविकांनी जलाशयात उतरू नये७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नाझरे जलाशयात केवळ ९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून हा मृतसाठा आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर खड्डे व गाळ असल्याने भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही. आजूबाजूच्या व्यावसायिकांनी भाविकांना समाजावून सांगितले तरी भाविक स्नानादीविधीच्या श्रद्धेपोटी दुर्लक्ष करतात. कृपया भाविकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन करणारे सूचना फलक पाटबंधारे विभागाकडून लावण्यात आल्याचे शाखा अभियंता शंकर चवलंग यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत  शंभरहून अधिक भाविकांचा  मल्हारसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी भाविकांच्या स्नानासाठी येथे घाट तयार करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीDeathमृत्यू