शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

युवक दिन विशेष - चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 12:06 AM

पाण्याविना दहा हजार रोपे जळाली : टॅँकरही झालेत बंद; परिसर झाला हिरवागार

श्रीकिशन काळेपुणे : गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. पण जेवढी रोपे जगवता येतील, तेवढी मी जगविण्याचा प्रयत्न करतोय, या भावना आहेत एका तरुण वन विभागातील गार्डच्या. ३१ वर्षीय वनरक्षक रोहन दत्तात्रेय इंगवळे असे त्याचे नाव असून, तो या रोपांनी जगावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज येथील वन परिसरात तो काम करीत आहे. वन विभागातर्फे १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यात आली. परंतु, अनेक रोपे पाण्याविना जळून गेली आहेत. बरीच रोपे प्राण्यांमुळे मोडली आहेत. इंदापूर तालुक्यातील डाळज वन परिसरात गेल्या वर्षी सुमारे १४ हजार रोपे लावली. या रोपांना पाणी देण्याचे काम फॉरेस्ट गार्ड रोहन इंगवळे करीत आहेत. ते म्हणाले, ‘‘सध्या पाण्याची खूप टंचाई आहे. आठवड्यातून तीन दिवस पाणी देण्यासाठी वेळ मिळतो.’’ दरम्यान, परसवाडी वन विभागात गार्ड तानाजी रमेश पिचड आणि शिर्सफळ वन विभागात प्रतिक्षा सुभाष खोमणेदेखील मेहनत घेतात.युवक दिन विशेषआठवड्यातून तीन दिवसच पाणी...उजनी धरणातून जी पाइपलाइन पुढे सोलापूरकडील गावांसाठी गेली आहे, त्या पाइपलाइनला वन परिसरात चार ठिकाणी व्हॉल्व लावले आहेत. त्या व्हॉल्वमधून झाडांना पाणी दिले जाते. परंतु, आठवड्यातून तीनच दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे तीनच दिवस झाडांना पाणी द्यावे लागते. एका रोपाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिले तरी चालते. त्यामुळे तीन दिवसांत काही झाडांना पाणी दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात इतर झाडांना देतो. व्हॉल्वपासून दूर असणाºया झाडांना आता बाटली लावून पाणी देणार आहे. त्यासाठी बाटल्या जमा करीत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले.डाळजला पूर्वी टॅँकरने पाणी दिले जात होते. परंतु, ते बंद झाले आहे. त्यामुळे आता आम्हालाच पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पाणी नसल्याने रोपे जळून जात आहेत. आता ४ हजारच्या जवळपास रोपे जिवंत आहेत. रोपे जळाली की वाईट वाटतं. पण पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही.- आर. डी. इंगवळे, फॉरेस्ट गार्ड,डाळज वन विभाग 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस