शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

पुण्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच; गळफास घेत तरुणाची आत्महत्या; धायरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 10:27 IST

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.९) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

विनायक जालिंदर बंडगर (वय:२३ वर्षे, रायकर मळा, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायकला दारूचे व्यसन होते. त्याचे आई वडील हे किराणा मालाचे दुकान चालवत असून गुरुवारी सायंकाळी तो मित्रांबरोबर बाहेर गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत घरी आला त्यावेळी आई वडील दुकानात होते.   रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी गेली. त्यावेळी त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अज्ञात कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अशोक कदम करीत आहे. 

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यूPoliceपोलिस