शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कथित पत्नीने मित्राच्या मदतीने छळ केल्याच्या कारणावरून तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:47 IST

कथित पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने २८ वर्षे वयाच्या तरुणास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फ्लॅटसाठी ४०- ५० हजार रुपये घेऊनही आणखी पैसे घेऊन ये म्हणून त्रास दिला. त्यामुळे सदर तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. 

पुणे : कथित पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने २८ वर्षे वयाच्या तरुणास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फ्लॅटसाठी ४०- ५० हजार रुपये घेऊनही आणखी पैसे घेऊन ये म्हणून त्रास दिला. त्यामुळे सदर तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. 

गणेश बाळासाहेब जगताप (वय २८, रा.  मोटार स्टँड, गणेश मंगल कार्यालयासमोर, उरुळी कांचन, ता. हवेली) याने आत्महत्या केली आहे. त्याचे वडील बाळासाहेब मारुती जगताप (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोनाली व तिचा मित्र भीमा गोरे (दोघांचेही पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचे विरोधात पैशाची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळासाहेब जगताप यांना गणेश व अक्षय अशी दोन मुले असून, अक्षय हा विवाहित असून, सैन्यदलात नोकरी करतो. गणेश हा मत्स्यविक्रीचा व्यवसाय करतो. व्यवसायातून त्याला चांगली कमाई होते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी तो सोनाली नावाचे मुलीला घरी घेऊन आला व त्याने आई - वडिलांना ही माझी मैत्रीण असून मला तिचेशी लग्न करावयाचे आहे असे सांगितले. तिच्या आई वडिलांशी गाठ घालून दे मग लग्नाचे पाहू असे सांगितले असता त्याने तिला कोणीही नाही, ती अनाथ आहे असे सांगितले. त्याने तिचे पूर्ण नाव व पत्ता सांगितला नाही. तिला ५ दिवस घरात ठेवले. त्यानंतर त्याने तिला हडपसर येथे घेऊन गेला. तेथे एका खोलीत ते राहू लागले. 

६ मे रोजी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.  पोलीस आल्यानंतर त्याला खाली घेण्यात आले. पोलिसांनी त्याची तपासणी केली त्यांना पॅन्टच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळून आल्या. त्यात माझ्या बायकोला माझे प्रेम समजले नाही. ते दोघे माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत. त्यांना सोडू नका, असे लिहिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याPoliceपोलिस