चिमुकलीशी अश्लील चाळे, तरुणाचा जामिन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:22 IST2017-10-12T13:18:06+5:302017-10-12T13:22:19+5:30

८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. 

youth bail refuting | चिमुकलीशी अश्लील चाळे, तरुणाचा जामिन फेटाळला

चिमुकलीशी अश्लील चाळे, तरुणाचा जामिन फेटाळला

ठळक मुद्देही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास निगडी भागात घडली.अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.

पुणे : वातानुकुलित यंत्र (ए. सी.) दुरूस्त करायला गेल्यानंतर ८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. 
या प्रकरणी त्या मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास निगडी भागात घडली. फिर्यादीचा ए.सी. दुरुस्त करण्यासाठी अडागळे फिर्यादीच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडित मुलगी ए. सी. ची खोली उघडून देण्यासाठी गेली. त्यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी अडागळे याला अटक केली आहे. तो  न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. पीडित मुलीचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जामिन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामिन फेटाळावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला.

Web Title: youth bail refuting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.