शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावरील पायवाटेत तरूण-तरूणीवर कोयत्याने हल्ला; तरुणीची सोन्याची साखळी हिसकावली

By श्रीकिशन काळे | Updated: April 17, 2023 17:17 IST

तरुणाने ओरडून 'तुम्हाला जे पाहिजे, ते घ्या पण आम्हाला सोडा' असे सांगून दोघांचा बचाव केला

पुणे: सिंहगडावर आतकरवाडीतून जाणाऱ्या तरूण-तरूणीवर दोन अज्ञातांनी काठी व कोयत्याने हल्ला करून त्यांना लुटले. त्यांच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम हिसकावून घेतली. ही घटना रविवारी दुपारी घडली. पायवाटेवरून जाताना पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे.या विषयी हवेली पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. विवेककुमार बाबुलाल प्रसाद (वय २८, रा. ससाणेनगर, हडपसर) हा तरुण आपल्या मैत्रिणीसह आतकरवाडीतून पायवाटेने सिंहगडावर चालत होता. 

दुपारची वेळ होती. खूप उन्ह असल्याने त्या परिसरात कोणी नव्हते. चालताना एका ठिकाणी दोन तरूण त्यांना दिसले. दोघेही त्यानंतर पुढे चालू लागले. तेव्हा दोन व्यक्तींनी विवेककुमार याच्यावर कोयत्याने व काठीने हल्ला केला. तेव्हा त्याच्या हातातून रक्त येऊ लागले. विवेककुमारने ओरडून तुम्हाला जे पाहिजे, ते घ्या पण आम्हाला सोडा, असे सांगितले. तरूणीच्या गळ्यातील साखळी एकाने ओढून घेतली. रोख रक्कम व इतर ऐवज असा मिळून काही हजारांचा माल त्यांनी हिसकावून नेला. ते पळून गेल्यानंतर विवेककुमारने पोलीसांना फोन केला आणि सर्व माहिती दिल.  

दरम्यान, वन विभागाने गेल्या वर्षी पायवाटेवर असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे परिसरात विक्रेते दिसून येत नाहीत. जर विक्रेत्यांची दुकाने असती, तर कदाचित ही घटना घडली नसती, अशी चर्चा केली जात आहे. कारण विक्रेते नसल्यामुळे तिथे वर्दळ कमी होती. या घटनेमुळे सिंहगड परिसरात फिरायला येणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणून या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहून आरोपींना तत्काळ अटक करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला