शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:02 IST

जीन्स पॅन्टच्या खिशात एक गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तूलाबाबत विचारणा केल्यावर श्वेतांग निकाळजे याने त्याला हे पिस्तूल ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देसराईत गुन्हेगार श्वेतांग निकाळजेने दिले होते पिस्तुल

पुणे :  अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या श्वेतांग निकाळजे याने ठेवण्यासाठी दिलेले पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचे एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ऋषिकेश सुनील गायकवाड (वय २१, रा़ कसबा पेठ) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील ऋषिकेश गायकवाड हा शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात येणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कर्चमारी नरेश बलसाने व ज्ञानेश्वर देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी तो त्याच्यासोबत पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे राहिला असल्याचे सांगितले. तसेच त्याची झडती घेतल्यावर त्याच्या जिन्स पॅन्टच्या खिशात एक गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तूलाबाबत विचारणा केल्यावर श्वेतांग निकाळजे याने त्याला हे पिस्तूल ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. सराईत गुन्हेगार निकाळजे हा अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेल्यानंतर तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती़. तेव्हा पुणे शहरांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता़ . श्वेतांग निकाळजे याला पोलिसांनी भोर येथून पकडून अल्पवयीन मुलीची सुटका केली होती़. परंतु, तेव्हापासून  ऋषिकेश गायकवाड हा फरार होता़. ही कारवाई पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे, कर्मचारी नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजेंद्र कचरे, कविता नलावडे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस