शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:48 IST

निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे

पुणे :  तरुणीने शेजारी राहणार्‍या महिलेच्या मुलाला हाताने मारहाण केली. तिच्या आईने कोयत्या सारख्या हत्याराने दोन दुचाकीवर वार करुन त्यांची तोडफोड केली. त्याचे नुकसान केल्यावर तक्रार देण्यासाठी आई व भावासोबत ही २१ वर्षाची तरुणी कर्वेनगर पोलीस चौकीत गेली. तेथे तिची तक्रार नोंदवून घेऊनही तिने महिला पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच चौकीचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना ‘‘ए तू हो बाजूला’’ असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढुन बाजूला केले. त्यासाठी निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे.

हा प्रकार कर्वेनगरमधील गुरुप्रसाद कॉलनीत रविवारी दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडला. याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय ४५, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहे. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. त्याचा राग मनात धरुन मृणाल पाटील ही फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून गेली. फिर्यादींना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. संजना पाटील यांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकीवर वार करुन तोडफोड करुन नुकसान केले.

दुसरी फिर्यादी महिला पोलीस अंमलदार सुषमा घोळवे यांनी दिली आहे. त्यावरुन मृणाल किरण पाटील हिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही भांडणे झाल्यानंतर मृणाल पाटील ही तिची आई संजना व भाऊ आर्यन यांच्यासोबत कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्या होता. तेथे तक्रार न देता वारजे पोलीस चौकीत गेल्या. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेवूनही त्या पुन्हा कर्वेनगर पोलीस चौकीत आल्या. पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत, असे म्हणत असताना फिर्यादी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृणाल हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच कर्वेनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना ‘‘ए तू हो बाजूला’’ असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढून बाजूला केले. व फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला