शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 18:27 IST

‘मी या गल्लीतला भाई आहे' असे म्हणत पसरवली दहशत

पुणे : पूर्ववैमनस्यातून काळेपडळ येथील भाई म्हणवून घेणाऱ्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

योगेश कुंदर (वय २५), मुन्ना बलाडे (वय १९), अनिकेत कुंदर (वय २०) आणि चेतन कांबळे (वय २०, सर्व रा़ नाईकनवरे बिल्डिंग, काळेपडळ, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ दत्तात्रय चौतमहल (वय २०, रा़ नाईकनवरे सोसायटी, काळेपडळ, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सौरभ व त्याचे मित्र लखन कासले व नामदेव सोडगे हे काळेपडळ रोडवरील समृद्धी रेस्टॉरंटसमोर रविवारी दुपारी बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले़. त्यांनी सौरभ याला जवळ बोलावून जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन कोयत्याने सौरभच्या हातावर व डोक्यात वार केले. तसेच इतरांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मारहाण करताना कुंदर याने ‘मी या गल्लीतला भाई आहे,’ असे हत्यारासह ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू